घरमहाराष्ट्रमतदानाची तयारी सुरू

मतदानाची तयारी सुरू

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दहा मतदार संघात मतदानाच्या अनुषंगिक सर्व कामकाज नियोजनबद्ध होत आहे. आता मुंबई शहर जिल्ह्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले. ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी पोहचवण्यासाठीची प्राथमिक तयारीही आता सुरू करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हास्तरावर निवडणुकीच्या कामकाजासाठी समन्वय अधिकारी (NODAL OFFICER) म्हणून विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व समिती प्रमुखांचा निवडणूक कामकाजाविषयी आढावा जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला आहे. दहा विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आपआपल्या मतदारसंघातील कामकाजासंदर्भात माहिती सादर केली.

- Advertisement -

माध्यम कक्षास खर्च निरीक्षकांची भेट

सोशल मिडीया प्रभावशाली असल्याने या माध्यमाचा निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. याचे निरीक्षण माध्यम कक्षामार्फत करण्यात येते. या कामाचा आढावा मा. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) देबाकुमार सोनावल यांनी आज घेतला.

- Advertisement -

गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त मतदान केंद्र
मुंबई शहरात आणि उपनगरात गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त असे मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे ही मुंबई उपनगरात उभारण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरात ४० ठिकाणी अतिरिक्त मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गर्दीच्या वेळी गैरसोय टाळण्यासाठी या मतदारसंघात अतिरिक्त मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चांदिवलीच्या २ उमेदरवारांना नोटीसब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी (लोकदल पक्ष) व मोहम्मद इम्रान कुरेशी (ए.आय.एम.आय.एम.) या दोन उमेदवारांनी लेखे सादर केले नाहीत. या अनुषंगाने १६८ – चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर रोकडे यांनी सदर दोन्ही उमेदवारांना लेखे सादर केले नाहीत. त्याबाबतचा खुलासा करण्यासाठी आयोगाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -