घरदेश-विदेशमंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रात तयार होणार लस; 'या' संस्थेने घेतला पुढाकार

मंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रात तयार होणार लस; ‘या’ संस्थेने घेतला पुढाकार

Subscribe

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या मंकीपॉक्सचे 8 रुग्ण आढळून येत आहेत

मुंबई : जगभरात मंकीपॉक्स वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली. महाराष्ट्रातही मंकीपॉक्सचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांची पाहणी करत आहे. यात आता मंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रातच लस तयार केली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ज्या संस्थांना मंकीपॉक्सविरोधात लस बनविण्याची इच्छा आहे अशा संस्थांना अर्ज करण्याची मागणी केली होती. यात खासगी लस उत्पादक कंपन्यांसह मुंबईतील परळमधील राज्य शासनाच्या हाफकिन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्थेने लस बनविण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारतात लवकरचं आता मंकीपॉक्सविरोधात लस उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या मंकीपॉक्सचे 8 रुग्ण आढळून येत आहेत. यात दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र देशातील मंकीपॉक्स रुग्णसंख्या लक्षात घेता ही लस भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

- Advertisement -

हाफकिन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्थेने मंकीपॉक्स आजाराविरोधात लस तयार करण्याची तयारी दाखविल्याच्या वृत्तास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. हाफकिन ही देशातील सर्वात जुनी संस्था असून तिची स्थापन 1899 मध्ये झाली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून विविध रोगांवर लस निर्मिती करण्याबरोबरचं त्यासंदर्भात प्रशिक्षण आणि संशोधनही केले जाते. या संस्थेक़डे लस बनविण्यासाठी पुरेशी साधन सामग्री आहे. यात जर आयसीएमआरने लस बनविण्यास परवानगी दिली तर या संस्थेत सर्व प्रकारच्या लस उत्पादन पूर्वीच्या आणि लस तयार झाल्यानंतरच्या चाचणीची व्यवस्था आहे. याच ठिकाणी जर लस तयार झाली तर त्याचे उत्पादन यात परिसरातील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात केले जाईल.


50 थर लावले पण खालच्यांना लाथ मारून वरच्यांनीच मलई खाल्ली; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -