घरदेश-विदेशइंग्रजांची माफी मागितल्याचा पुरावा सादर करा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान

इंग्रजांची माफी मागितल्याचा पुरावा सादर करा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान

Subscribe

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे सादर करा, असे थेट आव्हानच वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त भाष्य केले होते. माफी मागायला मी काही सावरकर नाही गांधी आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. आता यावर वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे सादर करा, असे थेट आव्हानच वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाही’, असे सांगितले. मोदींच्या आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नात राहुल गांधींनी सावरकरांवर भाष्य केले होते.

- Advertisement -

दुसरीकडे, सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींच्या अशा वक्तव्यांना बालिश ठरवून म्हटले आहे की, राहुल गांधी म्हणत आहेत की ते सावरकर नाहीत म्हणून ते माफी मागणार नाहीत. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी सावरकरांच्या माफीची कागदपत्रे दाखवावीत. रणजित सावरकर म्हणाले, राजकारण करण्यासाठी देशभक्तांच्या नावाचा वापर करणे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. याबाबत कार्यवाही करावी.

( हेही वाचा: राहुल गांधींनंतर गुजरातमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याला मोदींच्या अपमान प्रकरणी शिक्षा, ‘असे’ आहे प्रकरण )

- Advertisement -

भारत जोडो यात्रेत सावरकरांवर केले भाष्य 

याआधी 2022 मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका सभेत वीर सावरकरांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत. ते म्हणाले होते की सावरकरजी, ते दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते, म्हणून त्यांनी आम्हाला माफ करण्यासाठी पत्रे लिहायला सुरुवात केली. एक पत्र सादर करताना राहुल यांनी ते सावरकरांनी लिहिलेले असल्याचा दावा केला होता. या प्रकरणीदेखील रणजित सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -