घरमहाराष्ट्रपरिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे वाहतुक नियोजन आराखड्याचे सादरीकरण

परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे वाहतुक नियोजन आराखड्याचे सादरीकरण

Subscribe

शहर आणि परिसरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला चालना देणे, वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी “सर्वसमावेशक वाहतुक आणि वाहतुक नियोजन आराखड्याचे” सादरीकरण एल ॲण्ड टी कंपनीच्यावतीने आज (PUMTA) च्या बैठकीत करण्यात आले. हा आराखडा “पीएमआरडीए”च्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून हा आराखडा परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने यावर तज्ज्ञांसह, अभ्यासक, नागरिकांनी हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केले.

येथील विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी “पीएमआरडीए”चे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, प्राधिकरणाचे सचिव तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार देवरे, तसेच वाहतुक आणि नागरी प्रश्नावर काम करणारे इंग्लडचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. वाहतूक समस्या ही सर्व शहरांसमोरील मोठी समस्या आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

या बैठकीत महामेट्रो, एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या पार्किंग सुविधेवर चर्चा करण्यात आली. यावेळी एल ॲण्ड टी कंपनीच्यावतीने वाहतुकीच्या नियोजनाबातच्या आराखड्याचे सादरीकीकरण केले. या बैठकीला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

आम्हाला बाजूला ठेवल्यामुळे फडणवीस पायउतार – एकनाथ खडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -