(Presidential Address) मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभतील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच, मोदी सरकारच्या कामगिरीचा पाढाही वाचला. आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या ‘मेरी सरकार’ या उल्लेखावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. (Sushma Andhare Taunts Draupadi Murmu)
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, माझ्या सरकारने वक्फ बोर्ड आणि वन नेशन वन इलेक्शन यासारख्या मुद्द्यांवर मोठे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 91 लाखांहून अधिक बचत गटांना सक्षम केले जात आहे, असे सांगून राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, भारत आपली मानवी अंतराळ मोहीम, गगनयान, प्रक्षेपित करणार असून तो दिवस फार लांब नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात भारताचे योगदान वाढवण्यासाठी सरकारने ‘इंडिया एआय मिशन’ सुरू केले आहे, असे त्या म्हणाल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणामध्ये वारंवार ” मेरी सरकार ” असा उल्लेख येत होता. वास्तविक राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात.
मेरी सरकारऐवजी “अपनी सरकार” हा उल्लेख भारतवासीयांना अधिक आपुलकीचा वाटला असता!— SushmaTai Andhare (@andharesushama) January 31, 2025
महिलांच्या नेतृत्वाखाली देशाला सक्षम करण्याची भूमिका माझ्या सरकारची आहे. देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी माझे सरकार प्रयत्नशील असून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. तीन कोटी लखपती दिदी तयार करण्याचा आमचा उद्देश आहे. ड्रोन दिदी योजनेद्वारे महिलांचे सशक्तिकरण झाले आहे. विविध सरकारी योजनांमुळे गरिबांचा सन्मान वाढत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.
हेही वाचा – BUDGET 2025 : तुमच्या खिशावर परिणाम करतील पाच बदल; 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम
या भाषणात त्यांनी वारंवार ‘मेरी सरकार’ असा उल्लेख केला, त्याला सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणामध्ये वारंवार “मेरी सरकार” असा उल्लेख येत होता. वास्तविक राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. मेरी सरकारऐवजी “अपनी सरकार” हा उल्लेख भारतवासीयांना अधिक आपुलकीचा वाटला असता, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Presidential Address: Sushma Andhare Taunts Draupadi Murmu)
हेही वाचा – Parliament session : वक्फ बोर्ड, एआयपासून महाकुंभतील चेंगराचेंगरीपर्यंत…, राष्ट्रपतींचे संसदेत अभिभाषण