घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरचक्क! दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणी; काय आहे प्रकार?

चक्क! दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणी; काय आहे प्रकार?

Subscribe

गंगापुर : शासन निर्णयानुसार तुकडेबंदी आदेशाचा व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 च्या नियम 44(1) नुसार आदेशाचे पालन न करता सर्रासपणे बेकायदेशीर दस्तांच्या नोंदणी करणार्‍या गंगापूर येथील दुय्यम निबंधक प्रविण राठोड याची उच्चस्तरीय चौकशी करून त्वरित निलंबीत करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
गंगापूर येथील दुय्यमनिबंधक वर्ग- 2 प्रवीण राठोड हे शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जावून बेकायदेशीर व परवानगी नसलेल्या तसेच गावठाण हद्दीच्या बाहेरील खाजगी गटामधील तसेच नमुना 8 अच्या उतार्‍या आधारे दस्तांच्या नोंदी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात केल्या आहे ही बाब अत्यंत गंभीर असून व शासन विरोधी आहे.

यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. दुय्यम निबंधक हे कुठल्याही दस्ताची शहानिशा न करता विना परवानगी मिळकतीवर कुळ असलेल्या बेकायदेशीर दस्ताची नोंदणी मोठ्या प्रमाणात करत असल्याने राठोड यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्वरित निलंबीत करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दस्त नोंदणीसाठी ग्रामसेवकांनी दिलेल्या गावठाण प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत कार्यालयाचा कोणताही जावक क्रमांक नाही तसेच नोंदणी दस्तासोबत नगर रचना विभागाचा नकाशा अथवा ना हरकत प्रमाणपत्र नाही सदर जमीन ही महसूल क्षेत्रातील असतानाही ती गावठाण हद्दीत असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक करून खोटी दस्त नोंदणी करण्यात आली.

दुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांनी मिळकतीवर कुळ असताना तसेच गावठाण हद्दीच्या बाहेरील खाजगी गटामधील त्याचप्रमाणे नमुना 8 अ ग्राह्य धरत या उतार्‍याच्या आधारे दस्तांच्या नोंदी केल्या चिरीमिरी घेतल्या शिवाय दस्त नोंदणी होत नाही या सर्व बेकायदेशीर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करुन त्वरित निलंबीत करावे. अन्यथा आम आदमी पक्षाच्या वतीने लोकशाहीमार्गाने जन आंदोलन उभारणार. : भाऊसाहेब शेळके, तालुका अध्यक्ष, आम आदमी पार्टी 

दुय्यम निबंधक राठोड यांनी तालुक्यातील अनेक ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संगनमत करून बोगस गावठाण प्रमाणपत्र हस्तगत करून तसेच गावठाण हद्दीच्या बाहेरील खाजगी गटामधील खरेदीखताच्या नोंदी केल्या. सर्व बेकायदेशीर दस्तांची नोंदणीची उच्चस्तरीय चौकशी करून शासनाच्या बुडालेल्या महसूलची वसूली करून निलंबित करावे,अन्यथा भीक मांगो आंदोलन करून भीकेची रक्कम दुय्यम निबंधक यांना देण्यात येणार. : मुसा शेख, तालुका अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष 

दुय्यम निबंधक राठोड यांनी सक्षम अधिकार्‍यांच्या विनापरवानगी बेकायदेशीर दस्त नोंदणीचा वरिष्ठांच्या आशीर्वादाने सपाटा लावल्याने शासनाचा करोडो रुपये महसूल बुडाला. आतापर्यंत केलेल्या सर्व बेकायदेशीर दस्तांच्या नोंदीची उच्चस्तरीय चौकशी करून शासनाचा बुडवण्यात आलेल्या महसूलची वसुली करून निलंबित करावे. : अलीम सय्यद, विधानसभा अध्यक्ष, युवक काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -