घरमहाराष्ट्रखळबळजनक! ५१२ किलो कांद्याला अवघा २ दोन रुपये भाव, चेक वठणार १५...

खळबळजनक! ५१२ किलो कांद्याला अवघा २ दोन रुपये भाव, चेक वठणार १५ दिवसांनी!

Subscribe

Farmer Bill viral in Social Media | शेतकऱ्याने केलेल्या या व्यवहाराचे बिल आणि त्याला मिळालेला २ रुपयांचा चेक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Farmer Bill viral in Social Media | सोलापूर – योग्य हमीभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत नेहमीच पाणी असतं. मात्र, सोलापुरातू अशी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यात ५१२ किलो कांदा विकल्यावरही संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे २ रुपये मिळाले आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक मिळाला असून हा चेक १५ दिवसांनी वठणार आहे. शेतकऱ्याने केलेल्या या व्यवहाराचे बिल आणि त्याला मिळालेला २ रुपयांचा चेक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – लोकसहभागातून ६ हजार बंधार्‍यांचे काम पूर्ण; हजारो हेक्टर जमीन झाली हिरवीगार

- Advertisement -

सोलापुरातील या शेतकऱ्याचं नाव आहे राजेंद्र चव्हाण. त्यांनी ५१२ किलो कांदा व्यापाराला विकला. या कांद्याला त्यांना प्रति किलो १ रुपयेच मिळाले आहेत. म्हणजेच, ५१२ किलो कांदा विकल्यावर फक्त ५१२ रुपये मिळाले आहेत. यापैकी, हमाली ४०.४५ रुपये, तोलाई २४.०६ रुपये, भाडे १५ रुपये, रोख उचल ४३०, ५०९ रुपये मिळून एकूण ५०९ रुपये कापण्यात आले. तर, २.४९ रुपये रक्कम शेतकऱ्याला मिळाली. यापैकीही व्यापाराने केवळ शेतकऱ्याला २ रुपयाचा चेक दिला. तो चेकही पंधरा दिवसांनंतर वठणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी बाजारात कांद्याचे भाव घसरले आहेत. घाऊक बाजारात कांदा पाच ते आठ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे कांदा शेतकरी तोट्यात आहेत. संबंधित शेतकऱ्याची बाब स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनाही समजली. त्यांनीही याबाबत सरकारला फैलावर घेतलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दारूच्या नशेत पत्नीचा खून; म्हणे, ‘पाय घसरुन पडली’

राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले,राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -