घरगुती गॅस सिलिंडर 1 हजार पार

price of a domestic cylinder has gone up by Rs 3.50

price of lpg domestic gas cylinder cylinder price hiked by rs 50

महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले असतानाच घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात महिन्याभरात दुसर्‍यांदा वाढ झाली आहे. गुरुवारी घरगुती सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली. त्यामुळे देशात गॅस सिलिंडरचे दर 1 हजारांच्या पलीकडे गेले आहेत. या दरवाढीमुळे 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये आणि चेन्नईत 1018.5 रुपये इतकी झाली आहे. सोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 8 रुपयांनी वाढल्या आहेत. परिणामी 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरचे दर मुंबईत 2507 रुपये, दिल्लीत 2354 रुपये आणि कोलकात्यात 2306 रुपये इतके झाले आहेत.

मागील 12 दिवसांत दुसर्‍यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ करण्यात आली आहे. याआधी 7 मे रोजी गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली. आता गेल्या 12 दिवसांत तब्बल 53.50 रुपयांनी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.

प्रमुख शहरांतील घरगुती गॅसच्या किमती

दिल्ली – 1003 रुपये प्रतिसिलिंडर
कोलकाता – 1029 रुपये प्रतिसिलिंडर
मुंबई – 1002.50 रुपये प्रतिसिलिंडर
चेन्नई – 1018.50 रुपये प्रतिसिलिंडर

प्रमुख शहरांतील व्यावसायिक गॅसच्या किमती

दिल्ली – 2354 रुपये प्रतिसिलिंडर
कोलकाता – 2454 रुपये प्रतिसिलिंडर
मुंबई – 2306 रुपये प्रतिसिलिंडर
चेन्नई – 2507 रुपये प्रतिसिलिंडर

देशभरात मागील अनेक दिवसांपासून सतत महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल यांसह सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमतीतही वाढ होत आहे. या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.