History Of The Day: मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य अभिमान; आजच्याच दिवशी घडला पानिपतचा इतिहास, जाणून घ्या

भारताच्या इतिहासात 14 जानेवारी या तारखेला विशेष महत्त्व आहे. 1761 मध्ये 14 जानेवारीला पानिपतची तिसरी लढाई अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या सैन्यात झाली. हे युद्ध 18 व्या शतकातील सर्वात भयंकर युद्ध म्हणून लक्षात ठेवले जाते, ज्यामध्ये मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

maratha history
maratha history

नवी दिल्लीः पानिपतची लढाई, ज्याने देशाचा इतिहास बदलला. पानिपतमध्ये तीन लढाया झाल्या, ज्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. परंतु मुघल शासक बाबर आणि लोधी साम्राज्य यांच्यात 21 एप्रिल 1526 रोजी झालेली पहिली लढाई इतिहासाच्या पानांमध्ये सर्वात महत्त्वाची ठरली, या लढाईने मुघल साम्राज्याला बळ दिले. दुसरी लढाई अंबालाजवळील शहाबाद मार्कंडा येथे सुलतानच्या बाजूने दौलतखान लोदी आणि बाबरच्या बाजूने मेहंदी ख्वाजा यांच्यात झाली, ज्यात मेहंदी ख्वाजा जिंकला.

भारताच्या इतिहासात 14 जानेवारी या तारखेला विशेष महत्त्व आहे. 1761 मध्ये 14 जानेवारीला पानिपतची तिसरी लढाई अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या सैन्यात झाली. हे युद्ध 18 व्या शतकातील सर्वात भयंकर युद्ध म्हणून लक्षात ठेवले जाते, ज्यामध्ये मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या लढाईत एकाच दिवसात हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि मराठ्यांचा वाढता साम्राज्यविस्तार तर थांबलाच, पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कमकुवत झालेल्या मुघल राजवटीच्या जागी देशात भगवा फडकण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या.

मराठ्यांच्या पराभवाचे एक कारण असे मानले जाते की, पेशवा बाळाजी बाजीराव यांनी रघुनाथराव, महादजी सिंधिया किंवा मल्हारराव होळकर यांच्या जागी भाऊ सदाशिवरावांना सेनापती म्हणून पाठवले. वरील तिघेही त्या वेळी उत्तर भारतात मराठा सैन्याचे नेतृत्व करण्यास सक्षम असताना भाऊ सदाशिवरावांना उत्तरेत लढण्याचा अनुभव नव्हता. त्याच वेळी युद्धानंतर खुद्द अहमद शाह अब्दालीने मराठ्यांच्या पराक्रमाची प्रशंसा केली आणि त्यांना खरा देशभक्त म्हटले.


हेही वाचा : माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर