नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहे. भाजप नेतृत्वातील एनडीएने नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा एकदा पंतप्रधान पदाचे उमेदवार दावेदार असल्याचे जाहीर केले आहे. पण विरोधकांची इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमदेवार कोण? संदर्भातील निर्णय अद्यापही झालेला नाही. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’शी बोलताना केले आहे.
अशोक गेहलोत यांनी इंडिया टुडेला शनिवारी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “राहुल गांधी हेच काँग्रेसकडून 2024च्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतली”, असे म्हणाले. इंडिया आघाडीसंदर्भात गेहलोत म्हणाले, “देशाच्या प्रत्येक निवडणुकीत स्थानक घटकांचे महत्त्व असते. पण देशातील परिस्थिती पाहात सर्व पक्षांवर आणि जनतेवर दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची युती झाली आहे.”
पंतप्रधानांनी अहंकारी राहू नये
“पंतप्रधान मोदींनी अहंकारी राहू नये, 2014 मध्ये भाजपला फक्त 31 टक्के मते मिळाली होती. बाकीचे 69 टक्के मते ही त्यांच्याविरोधात होती. जेव्हा इंडियाची बंगळुरूमध्ये बैठक पार पडली. तेव्हा एनडीए घाबरली होती. इंडियाच्या बैठकीनंतर एनडीएची बैठक घेण्यात आली होती”, असेही गेहलोत म्हणाले.
हेही वाचा – जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो लॉन्च? मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत काय-काय होणार…
इंडियाच्या मुंबई बैठकी काय-काय होणार
इंडियाची मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत इंडियाचा लोगो लाँच केला जाईल. युतीसाठी 3 ते 4 लोगो तयार करण्यात आले आहेत. या बैठकीत 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा कोणत्या स्वरूपात असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’ आघाडीमध्ये वाद होऊ नये यासाठी 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईच्या बैठकीत सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीमध्ये आतापर्यंत 3 सूत्रांवर चर्चा करण्यात आली असून ज्या पक्षाच्या जागेवर सध्या खासदार आहे त्याला ती जागा मिळेल. 2014 आणि 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षांना त्या जागेवर प्राधान्य देण्यात येईल.