घरताज्या घडामोडीपंतप्रधानांना युक्रेन युद्धाची चिंता, देशातील महागाईची नाही; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला

पंतप्रधानांना युक्रेन युद्धाची चिंता, देशातील महागाईची नाही; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला

Subscribe

देशभरात महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चालली आहे. इंधनाच्या किंमती वाढत असून, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. अशातच आज घरगुती गॅसच्या किमतीतही ५० रुपयांनी वाढ झाली. या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. याच महागाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देशभरात महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चालली आहे. इंधनाच्या किंमती वाढत असून, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. अशातच आज घरगुती गॅसच्या किमतीतही ५० रुपयांनी वाढ झाली. या दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. याच महागाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधानांना युक्रेन युद्धाची चिंता, देशातील महागाईची नाही’, असा टोला राऊतांनी हाणला असून, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीवरही टीका केली आहे.

“महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. पंतप्रधानांना रशिया-युक्रेन युद्धाची सर्वाधिक काळजी आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्त करताहेत आणि त्यांचे भक्त त्यासंदर्भात व्हावा करातहेत. पण या देशातली जनता महागाईशी युद्ध करतेय.”, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

- Advertisement -

“पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर, बेरोजगारी त्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा एकतरी नेता अथवा मंत्री बोलतोय का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसंच, भोंग्यावर कसले बोलताय, सरकार म्हणुन तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा याच्यावर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही.”, असंही राऊत यांनी म्हटलं.

याशिवाय राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील चितावणीखोर भाषण आणि मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसैनिकांनी आक्रमक भुमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी या मनसैनिकांचा धरपकड सुरू केली आहे. यावर ही आता संजय राऊतांनी टीका केली आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्रात लाउडस्पिकरचा मुद्दा कुठलाच नाही. काही लोकांनी लाउडस्पिकरच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव आणि दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार, या राज्यात काम सुरू आहे आणि नक्कीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय ते बरोबर आहे. आम्हीही तेच म्हणतोय की, या संदर्भात एक राष्ट्रीयधोरण तुम्ही जाहीर करा, धोरण तयार करा आणि संपुर्ण देशात लागू करा.” अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता केली.

“इथे जात आणि धर्माचा प्रश्न येत नाही. पण मशिदींवरील भोंग्याच्या विषय काढला ज्यांनी त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्रामध्ये हिंदू मंदिरांना बसला आहे. भजन, किर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या भूमिकेवर सगळ्यात जास्त नाराज कोणी असतील तर, तो हिंदू समाज आहे. हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खर म्हणजे यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगली घडवायाच्या आहेत. पण सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण आहे.”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा – Reliance Industries : ‘रिलायन्स’ ठरली 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -