पवार अनेक क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी, त्यांचा आदर्श घ्या, PM मोदींकडून शरद पवारांचे कौतुक

मी शरद पवार यांचे आभार व्यक्त करतो, शरद पवार म्हणाले हा कोणता युपीएचा निर्णय नाही. ज्यांना कोणाला सांगू शकतो त्यांना सांगतो त्यांच्यासह टीएमसीचे काही लोकं बैठकीला आले होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Prime Minister Narendra Modi apreciate Sharad Pawar in Rajya Sabha

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रस्तावावर बोलताना मोदींनी पवारांचे कौतुक करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात काँग्रेसनं राजकारण केले सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. परंतु काही लोकांनी या बैठीकाला हजर न राहण्यासाठी इतरांची मनधरणी केली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच कोरोना काळातसुद्धा शरद पवार यांनी दौरे केले आहेत. आदर्श घ्यायचा असल्यास शरद पवारांचा घ्या असा घणाघात मोदींनी विरोधकांवर करत पवारांचे कौतुक केलं आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणातील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. सोमवारी विरोधकांवर हल्लाबोल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे कौतुक केलं आहे. शरद पवार अनेक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देतात. तसेच ते आपल्या राज्यातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम करतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र नेमकं काय म्हणाले?

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे. तसेच मोदी म्हणाले की, काही लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जेव्हा कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राकडून सर्व राज्यांतील पक्षांना कोरोनासंदर्भात माहिती देण्यासाठी बैठक बोलावली होती. एकाबाजून काही लोकांना जाऊ नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते स्वतः सुद्धा आले नाही. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला.

मी शरद पवार यांचे आभार व्यक्त करतो, शरद पवार म्हणाले हा कोणता युपीएचा निर्णय नाही. ज्यांना कोणाला सांगू शकतो त्यांना सांगतो त्यांच्यासह टीएमसीचे काही लोकं बैठकीला आले होते. शरद पवारांनी आपली मतसुद्धा मांडली आहेत. हे संकट देशावर आणि मानव जातीवर आले होते यावरही राजकारण केलं. माहिती नाही विरोधक कोणाकडून सल्ला घेतात, ते स्वतःचे नुकसान करत आहेत. देश थांबला नाही तर देश पुढे चालला आहे. परंतु तुम्हीच अडकला आहात. दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये तुमच्याबद्दल चर्चा सुरु होत्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : ‘राऊतांसोबत चहा पिण्याची इच्छा झाल्यानंच घरी आलो’ संभाजीराजे-संजय राऊतांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण