पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, डी गँगकडून मुंबई पोलिसांकडे आला धमकीचा मेसेज

Prime Minister Narendra Modi Death threat D gang aide threatening message to Mumbai Police

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून हा मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दाऊदचे दोन हस्तक पंतप्रधान मोदींना जीवे मारणार असल्याचा मेसेज अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला आहे. या अज्ञात आरोपीने एकूण 7 मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले आहे. यात काही ऑडिओ क्लीप आणि काही फोटोंचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक ठार मारणार असल्याचं मेसेजमध्ये लिहिले आहे. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने संबंधित गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी याबाहची माहिती दिली आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.


शिवरायांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहणारे सीमावासीयांना काय न्याय देणार?, राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल