Maharashtra Corona: होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे अशी करणार ठाकरे सरकार व्यवस्था

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली.

Coronavirus Update corona third wave covid 19 situation under control in maharashtra said rajesh tope

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीला आरोग्याच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थितीत राहिले होते. मोदींसोबतच्या या आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या बैठकीमध्ये काय-काय झाले? केंद्राकडे कोणती मागणी राज्य सरकारडून करण्यात आली हे स्पष्ट केले. यादरम्यान होम टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची नोंद होत नसल्याचा मुद्दा केंद्रापुढे उपस्थित केला आहे. तसेच राज्यसरकारकडून आता होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे कशा प्रकारची व्यवस्था राबवली जाणार आहे, हे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोनाचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली होती. ८ मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली, तर उर्वरित सर्वजण ऐकत वापरत होते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या संपूर्ण गोष्टी लेखी पाठवण्याच्या संदर्भात सूचित केले होते. त्या सर्व गोष्टी केंद्राला लेखी पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वप्रथम कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशींचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस कोविशिल्ड ५० लाख उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यसरकारकडून करण्यात आली. कारण सध्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरण आणि बूस्टर डोस दिले जात आहे.’

‘तसेच बरेच लोकं होम कीटचा वापर करतायत. होम किट्स आणि रॅट (रॅपिट अँटीजन टेस्ट) माध्यमातून जे लोकं पॉझिटिव्ह होतायत. ते पॉझिटिव्ह झालेत याची आज खऱ्या अर्थाने आपल्या जवळ माहिती होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे आम्ही केंद्राच्या हे लक्षात आणून दिले आणि राज्याच्या वतीने आम्ही असे ठरवले की, ज्या ज्या फार्मासी कंपनी आणि फार्मासी शॉपमध्ये किट विकले जातेय, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्याचा डेटा रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्या मॉनिटरिंग करणारा जो सेल आहे, त्यांनीसुद्धा त्या लोकांच्या फोन नंबरवर फोन करून पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, त्याची पण माहिती घेतली पाहिजे. अशा स्वरुपाने आपण जाणीवपूर्वक त्यांची पॉझिटिव्ह, निगेटिव्हची माहिती घेण्याची व्यवस्था करत आहोत,’ असे राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा – कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी