घरमहाराष्ट्रशिळा मंदिर लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार, जय्यत तयारी सुरू

शिळा मंदिर लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार, जय्यत तयारी सुरू

Subscribe

४ जून रोजी हा कार्यक्रम असून भारतीय जनता पक्षाचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे या कार्यक्रमाची धुरा देण्यात आली आहे.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथे येणार आहेत. १४ जून रोजी हा कार्यक्रम असून भारतीय जनता पक्षाचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे या कार्यक्रमाची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच देहू येथील मंदिर परिसरात भेट देत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. (Prime Minister Narendra Modi maharashtra visit, will inaugurate of Shila Temple)

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देहू नगरीत येणार आहेत. त्यामुळे प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

- Advertisement -

तसेच, देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले असून ही पगडी नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.

कशी असेल पगडी?

- Advertisement -

पगडीसाठी विशेष कापड वापरण्यात आले आहे. पगडीच्या वरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली जाणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे हा सोहळा दोन वर्ष स्थगित करण्यात आला होता. मात्र, यंदा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. पण, पालखी सोहळ्याअगोदर पंतप्रधान देहू नगरीत भेट देणार आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -