घरताज्या घडामोडीमेळावा कोणत्याही पक्षाचा नव्हे तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा - प्रीतम...

मेळावा कोणत्याही पक्षाचा नव्हे तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा – प्रीतम मुंडे

Subscribe

आपला आवज केवळ बीडपर्यंत, मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहतो.

आपला मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे तर गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वंचित अपेक्षित व्यक्तीचा हा मेळावा असल्याचे खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. भगवान गडावरुन प्रीतम मुंडेंनी राजकारण्यांवरही निशाणा साधला आहे. राजकारणी आपल्या नावावर तसेच दुसऱ्याच्या नावावर बेनामी संपत्ती कमवतात परंतु गोपीनाथ मुंडे यांनी तुमच्यासाराखी माणसे जोडण्याची संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती कधीही कमी आणि कधीही खर्च न होणारी असल्याचेही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपलं राजकारणापलीकडचे नाते असून लोकांच्या मनात शंका होती मेळावा होईल का नाही. पंरतु त्यांना आता डोळे उघडून बघावे असा खोचक टोलाही प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.

भगवान गडावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रीतम मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधला आहे. यावेळी प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे की, मुंडे परिवारासाठी हा मेळावा फार महत्त्वाचा आहे कारण गोपीनाथ मुंडेंच्या घराचा प्रीतम मुंडे नाही तर मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मंचावर उपस्थित सगळी लोकं परिवाराचा हिस्सा आहेत तेवढेच तुंम्ही सुद्धा या परिवाराचा हिस्सा आहेत. म्हणून हा मेळावा फार महत्त्वाचा आणि लक्षवेधी ठरतो, हा कोणत्या पक्षाचा आणि राजकीय मेळावा नाही तर हा प्रत्येक वंचित अपेक्षित व्यक्तीचा मेळावा आहे. इथे आल्यावर एक ऊर्जा मिळते पुढचं येणारे वर्ष संघर्ष करण्यासाठी प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते म्हणून आपल्या मेळाव्याचे वैशिष्ट्ये आहे असे प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

बेनामी नव्हे कधीही खर्च न होणारी संपत्ती

राजकारणात आल्यानंतर काही लोकं इस्टेट कमवतात, काही लोकं बंगले बांधतात गाड्या घेतात, प्रॉपर्टी वाढवतात, नावावरची वाढवतात आणि बेनामी वाढवतात पण आमच्या वडिलांनी आमच्यासाठी जमा केलेली संपत्ती तुमच्या रुपाने उपस्थित आहे. ही संपत्ती कमी होत नाही, खर्च होत नाही आणि चोरु शकत नहाी. अशा संपत्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंडे साहेबांकडे एकच आशीर्वाद मागितला समाजातील नकारात्मकतेचा सामना करण्यासाठी शक्ती द्या अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली आहे.

अतिवृष्टीधारकांना मदत करणार

खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती की, मोठे हारतुरे घालून स्वागत करु नका तर अतिवृष्टी बाधितांसाठी मदत करा या विनंतीचा मान राखून गोपीनाथ प्रतिष्ठानतर्फे मदत केली आहे आणि ती मदत नुकसान झालेल्यांना पोहचवणार असल्याची माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मनात शंका होती त्यांनी डोळे उघडून पाहा

मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीवरुन प्रीतम मुंडे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे की, मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. लोकांच्या मनात शंका होती मेळावा होईल का नाही. ज्यांच्या मनात शंका होती त्यांनी डोळे उघडून बघा, हा जनसमुदाय मुंडेंच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. आपला आवज केवळ बीडपर्यंत, मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहतो.


हेही वाचा : Dasara Melava 2021 : रामदास कदम यांचे अनिल परबांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -