Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केंद्र सरकारच्या चुकांमुळे देशावर ऑक्सिजन संकट, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

केंद्र सरकारच्या चुकांमुळे देशावर ऑक्सिजन संकट, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. कोरोना परिस्थिती असताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही असे म्हटले होते. तसेच येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आयात करणार असल्याचे सांगितले होते. देशात कोरोना काळात मागील १० महिन्यांत ऑक्सिजनचा तुटवडा भासला नव्हता परंतु पुढेही ऑक्सिजन पुरवठ्याचा तुडवडा होणार नाही. असे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु केंद्र सरकार हा ऑक्सिजन पुरवठा आयात करण्यात अपयशी ठरले आहे. याची चुकी आता देशातील लोकांना भोगायला लागत असल्याचे काँग्रेस नेचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील ऑक्सिजनची स्थिती चांगली असून पुढेही कायम असेल असे सांगितले होते. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयातर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑक्सिजन आयात करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे देशावर ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट आले आहे. रुग्णालयातून आणि रुग्णांच्या नातेवाईकांडून ऑक्सिजनसाठी सतत फोन केले जात आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्ण संख्या वाढली असल्यामुळे रुग्णालयात कोरोनाबाधितांना घेतले जात नाही आहे. देशातून ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावत असल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीतील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागली हे सर्व भयानक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न केले आहेत. देशात ऑक्सिजन पुरवठा चांगला असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने कोणत्या आधारावर केला हाता? १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याबाबत काय झाले? मागील ५ महिन्यापासून आतापर्यंत किती टन ऑक्सिजन आयात केला? ही प्रक्रिया कोणी स्थगित केली? देशात एकूण १६२ पीएसए ऑक्सिजन संयत्रांपैकी आतापर्यंत फक्त ३३ रुग्णालयांत हे संयंत्र उभारण्यात आले आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आर्थिक परिषदेत संबोधन करताना स्वतःचे कौतुक करत सांगितले की भारताने कशाप्रकारे कोरोनाला हरवले? परंतु सध्या ५० देशांत भारतातून विमान वाहतूक बंद आहे. त्यांच्याकडे आपण मदतीची मागणी करत आहे. देशाला अशा नेतृत्वामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे निधन झालेल्या रुग्णांचे नातेवाईकांना याचे उत्तर पाहिजे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

- Advertisement -