मुंबई : महाराष्ट्रात प्रौढ पुरुष आणि महिलांची एकत्रित संख्या 9 कोटी 54 लाख असल्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2024 मध्ये दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडे विधानसभा निव डणुकीवेळी राज्यात 9 कोटी 70 लाख मतदारांची नोंद असल्याचे सांगण्यात आले होते. या आकडेवारीनुसार थेट 16 लाख मतदार कसे वाढले, असा सवाल काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष आणि प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात या संदर्भात एक लेख लिहून निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले आहे. यानंत आज प्रवीण चक्रवर्ती आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. (Prithviraj Chavan alleges that the victory of the Mahayuti was due to the increased voter turnout by the Election Commission)
आज मतदान दिन आहे. एका अर्थाने आज निवडणूक आयोगाचा वाढदिवस आहे. पण महाराष्ट्राची जनता कधी निवडणूक आयोगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मुद्दे आहेत, त्यामध्ये निवडणूक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, मतदार यादी, निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर, सत्तेचा वापर असे अनेक विषय आहेत. हे विषय वेगवेगळ्या पातळीवर काँग्रेस पक्ष मांडणार आहे. पण आज मतदार यांद्याबद्दल मुद्दा आहे.
महाविकास आघाडीच्या जवळजवळ 100 पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. हा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा संयुक्त निर्णय होता. सर्व उमेदवारांनी याचिका दाखल करावी. काही जणांना याचिका दाखल करता आली नाही. माझ्या स्वत:च्या याचिकेवर काल पहिली सुनावणी झाली. सहा आठवड्यानंतर सुनावणीची दुसरी तारीख पडेल. त्यामध्ये अनेक विषय घेतले जातील, पण आजचा विषय प्रविण चक्रवर्ती यांनी फक्त मतदार याद्यांमधील वाढीव मतदारांचा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत जो काही पाच ते सहा महिन्याचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये 76 लाख मतदार वाढले आहेत, असा आरोपी चव्हाण यांनी केला.
हेही वाचा – Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय, चव्हाण यांचा आरोप
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2019 च्या विधानसभेपासून 2024 च्या विधानसभेपर्यंत पाहिलं तर मागील पाच वर्षात 32 लाख मतदारांची संख्या वाढली आहे. पण विधानसभा निवडणूक होईपर्यंतच्या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत 76 मतदारांची संख्या वाढली आहे. जवळपास 50 लाख अतिरिक्त मतदार वाढले आहेत. यातील बहुतेक मतदान महायुतीच्या बाजूने झालं आहे. कारण लोकसभेमधील मतादानाचे आकडे पाहिले तर महायुतीला जवळजवळ 76 लाख मतं अतिरिक्त पडली आहेत. तसेच 32 लाख मतं महायुतीच्या बाजूने गेले आहेत. बाकीचे 48 लाख मतं ही नवीन मतदार नोंदणीमधली आहते. ही मत फक्त एका पक्षाला पडली आहेत. हे कोण मतदार होते, माहीत नाही. ही मत आभाळातून पडली का? ड्युप्लीकेट मतदार होते का? किंवा बाहेरच्या राज्यातून आलेले नागरिक होते, हे तपासावे लागेल. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व 248 मतदार संघाच्या याद्या मागवल्या आहेत. तसेच कोणी कोणत्या मतदार संघातून मतदान केलं, ही यादीही मागवली आहे. पण आम्हाला त्या याद्या काही मिळाल्या नाहीत.
आमचा प्रमुख आक्षेप आहे की, नवीन मतदारांची नोंदणी करताना घराचा सर्व्हे करावा लागतो, पण तसे काही केलेले नाही. लोणीमध्ये एका पत्यावर जवळपास 5 हजार मतांची नोंदणी झाली आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केली आहे, परंतु पुढे काहीच झाले नाही. मतदार याद्यांच्या या गोंधळानंतर महायुतीला जे यश मिळालं आहे, ते या वाढीव मतांमुळे वाढलं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे 132 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 25 हजार हजार मतदार वाढले आहेत. त्यापैकी 112 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. लोकसभा मतदार संघामध्ये फक्त 62 ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे होते. याचा अर्थ नवीन मतदार आल्यामुळे त्यांचा (महायुतीचा) विजय झाला आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे सर्व कागदपत्र दाखवण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : सहकार क्षेत्राबाबत बोलताना राऊतांनी अमित शहांना सुनावले, म्हणाले –