घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Subscribe

मागील काही दिवसांपासून देशात बेरोजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. तरीदेखील महागाई काही केल्या कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे. भरमसाठ करवाढ करून डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आली असल्याचे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

जे श्रीलंका, पाकिस्तान, युके आणि बांग्लादेशात झाले. तशी परिस्थिती भारतात येवू नये, यासाठी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. संसदेत चर्चा होत नाही. त्यामुळं फार चिंतेचं वातावरण आपल्या देशात आहे, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

देशातील तरुण पिढी बेरोजगार होत असून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना रोजगार मिळेल अशी कोणतीही ठोस उपाययोजना केंद्र सरकारकडे नसल्यानेच तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शपथविधी झाला, आता मंत्रिमंडळ विस्ताराकाडे लक्ष; बिहारमध्ये कोण कोण होणार मंत्री


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -