Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करा मग लॉकडाऊन करा - पृथ्वीराज...

नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करा मग लॉकडाऊन करा – पृथ्वीराज चव्हाण

Related Story

- Advertisement -

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे आहेत. त्यात आता काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. लॉकडाऊन दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने पाश्चिमात्य देशांप्रमाणे रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापरात आणावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणं गरजेचं असून, लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवण्यात यावा हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. आधी या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाच मागण्या

  • लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या
  • लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवा
  • लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा (पाश्चिमात्य देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा.
  • खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्या.
  • शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका
- Advertisement -

 

- Advertisement -