घरताज्या घडामोडीमी एखाद्या ट्वीटला लाईक का करेन?, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

मी एखाद्या ट्वीटला लाईक का करेन?, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Subscribe

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केलं होतं. मोहित कंबोज यांनी ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्या ट्विटला पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण दिलं असून मी एखाद्या ट्वीटला लाईक का करेन?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नक्की काय झालंय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात असं मी कधीही केलं नाही. मला जर असं करायचं असतं तर खुल्या मंचावरून केलं असतं. माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्वीटला लाईक का करेन?, असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं.

- Advertisement -

ट्विटरच्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचं चिन्हं का काढलं?, असा देखील प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा चव्हाण म्हणाले की, माझ्या कव्हर फोटोमध्ये काँग्रेसचं चिन्ह कधीच नव्हतं. जर कुणी असा दावा करत असेल तर ते कधी होतं?, ते त्यांनी दाखवावं, असंही चव्हाण म्हणाले.

राज्यात ऑपरेशन लोटस

- Advertisement -

महाराष्ट्रातील मागील अनेक दिवसांपासून मिशन लोटस सुरू आहे. विरोधी पक्षातील काही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचा आकडा कमी होतो. तसेच बहुमताचा आकडाही कमी होतो. त्यानंतर त्या आमदारांना पुन्हा निवडणुका लढवायला लावायच्या हे ऑपरेशन लोटस असतं. हे महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू आहे, असं चव्हाण म्हणाले होते.


हेही वाचा : मोहित कंबोज यांच्या ‘त्या’ ट्विटला काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं लाईक, राजकीय चर्चेला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -