Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारताच्या लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे - पृथ्वीराज चव्हाणांची टीका

भारताच्या लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे – पृथ्वीराज चव्हाणांची टीका

देशातील चित्र बदललेले आहे, संविधान वाचवा असे म्हणायची वेळ आली आहे.

Related Story

- Advertisement -

देशातील लोकशाही संपली असून आता देशाची वाटचाल रशियाच्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. केंद्र सरकारने देशातील संविधान संपवण्याचं काम केलं असल्याची टीका काँग्रेस नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकार यावर चौकशी करुन हे कोण करत आहे. याचा शोध घेत नाही आहे. भारताची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु आहे असं चित्र केंद्र सरकारमुळे जगभरात तयार झालं आहे. असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, साताऱ्याच्या भूमीतून क्रांतीसिंह नाना पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत वडूजच्या भूमीत ९ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे त्या बलिदानाचा आपणास विसर पडू नये. आज देशातील चित्र बदललेले आहे, संविधान वाचवा असे म्हणायची वेळ आली आहे. केंद्रातील सरकार संविधान संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

पुढे चव्हाण यांनी म्हटलं आहे की, संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे.

जुलमी सरकारविरोधात पेटून उठा

- Advertisement -

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना पंडित नेहरुंचा फोटो टाकण्याचे सौजन्यही न दाखवता त्यांना वगळून देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला जात आहे. ब्रिटीश राजवटीसारखेच केंद्रातील सध्याचे सरकार जुलमी अन्यायी, अत्याचारी, सरकार असून त्याविरोधात पेटून उठले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : ७४ वर्षांत उभा राहिलेला देश ७ वर्षांत विकला जातोय, नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisement -