घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींचा विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींचा विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद, पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता बंधूताऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष या मुद्द्यावर निवडणूक लढवून भाजपने यश मिळवले

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ७ वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केले आहेत. मोदी सरकारने ७ वर्षांच्या कालावधीत ७० वर्षात जे कमावलं होते ते गमवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींनी विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने शहिदांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थाकरता फायदा घेतला ते सगळ्यांनी पाहिले असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूकीच्या वेळी पुलवामा हल्ल्याचे स्मरण करुन आम्हाला मतदान करा असे म्हटले होते. शहिदांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थाकरता फायदा घेतला ते सगळ्यांनी पाहिले आहे. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता बंधूताऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष या मुद्द्यावर निवडणूक लढवून भाजपने यश मिळवले आहे. मागील २ वर्षांच्या कालावधीत मोदींच्या नेतृत्वात झालेली आर्थिक दुर्दशा, कोरोनाच्या काळात नियोजन शून्य कारभारामुळे तसेच अहंकरामुळे जी देशाची परिस्थिती झाली आहे ती सगळ्यांनी पाहिली आहे.

- Advertisement -

भारताची जगभरात कधी नव्हे ते नाचक्की झाली आहे. सुरुवातीला मोदींच्या कामकाजाची पद्धत पाहिली तर दडपशाही,ठोकशाही, हुकुमशाही दमण यापासून ती कारकिर्द सुरु झाली आहे. नव्याने गृहमंत्री पदाची शपथ घेतलेले अमित शाह यांनी पहिल्यांदाच राज्यघटनेतील कलम ३७० आणि ३५ अ हि कलमे रद्द केली. संसदेत पारित करुन घटनादुरुस्ती केली. हे सर्व करताना जम्मू काश्मीरमधला उठाव शांत करण्यासाठी दडपशाही, दंडुकेशाही वापरत काश्मीरमध्ये लाखो जनता आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकले. मोबाईलसेवा आणि इंटरनेटसेवा बंद केली. भाषण स्वातंत्र्यही भाजपने हिरावून घेतले असल्याचा घणाघात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -