Homeताज्या घडामोडीPrithviraj Chawan : साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत, पण निर्णय शरद पवारांकडे

Prithviraj Chawan : साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत, पण निर्णय शरद पवारांकडे

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात अनेक राजकीय पक्षांनी जागावाटप करण्यास सुरूवात केली आहे. परंतू, अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, सातारा लोकसभेच्या जागेवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे.

सातारा : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात अनेक राजकीय पक्षांनी जागावाटप करण्यास सुरूवात केली आहे. परंतू, अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, सातारा लोकसभेच्या जागेवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी आदेश दिल्यास मी साताऱ्यातून लढायला तयार असून अंतिम निर्णय पवार यांनाच घ्यायचा असल्याचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. (Prithviraj Chawan satara lok sabha constituency ncp sharad pawar mahavikas agahdi)

साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु असून पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर खुलासा केला आहे. “सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात सर्वांत सक्षम उमेदवार कोण, हे शोधण्याचे काम सुरू आहे. तो उमेदवार सर्वमान्य असेल. माझे नाव काही लोकांनी आणि माध्यमांनी चर्चेत आणले. सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे. माझी जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. उमेदवाराचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. शरद पवार जो उमेदवार देणार त्यामागे आम्ही पूर्ण ताकदीने मागे उभे राहू असं सांगितलं आहे. हा मतदासंघ हा तुतारीचा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा”, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

याशिवाय, “सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून प्रस्ताव अजून आला नाही, जर आला तर विचार करू. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. 48 पैकी जवळ जवळ सर्व जागांवर एकमत झाले त्याप्रमाणे सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला आहे. 2019 ला बालाकोट बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी त्याचा फायदा उचलत त्यांची 6 टक्क्यांनी मते वाढली होती. यावेळी राम मंदिराचा भावनिक विषय घेऊन त्यांचा फायदा ते घेऊ शकतात. पण असे होताना दिसत नाही”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“राम मंदिर हा विषय खाजगी आहे, तो दोन ट्रस्टचा एकमेकातील विषय होता. त्या ठिकाणी राम मंदिर ट्रस्टने लोकांची मदत घेऊन बांधले. या मंदिराच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींना बोलावले याचा अर्थ त्यांनी मंदिर बांधले असा होत नाही. त्यामुळे राम मंदिराचा फायदा भाजपाला होताना दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचारात वेगळेच मुद्दे पुढे येताना दिसत आहेत. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे आणि मनुस्मृती आणायची आहे. परंतु असे काही होणार नाही आणि घटना बदलणे ही एवढी सोपी गोष्ट नाही”, असेही चव्हाण म्हणाले.


हेही वाचा – MUKHTAR ANSARI : मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ म्हणतो – कहानी खत्म नहीं हुई, शुरू हुई है…