पुण्यात खासगी बसला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने १५ फूट खाली कोसळली बस

मुंबई येथून बेंगळुरूकडे निघालेल्या एका खासगी बसला पुण्यात शनिवारी रात्री अपघात झाला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हि बस १५ फूट खोल कोसळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Private bus accident in Pune; The bus fell down 15 feet

मुंबई येथून पुणेमार्गे बंगळुरू येथे जाण्यासाठी निघालेल्या एका खासगी बसला अपघात झाला आहे. पुण्यातील चांदणी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री ३-३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच हा अपघात घडला तेव्हा या बसमध्ये एकूण ३५ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नसून एकूण आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा ट्रॅव्हल्सची बस शनिवारी संध्याकाळी मुंबई येथून बंगळुरू येथे जाण्यासाठी निघाली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री ३-३.३० च्या सुमारास ही बस पुण्यातील चांदणी चौक येथील बावधन येथे मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर जाताना या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यानंतर ही १५ ते २० फूट खाली कोसळली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदर घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर तातडीने जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी कोथरूड येथील रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याहून हटवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. तर अपघात झालेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव आहे. त्यामुळे या परिसरात खूप अंधार असतो. ज्यामुळे इथे अपघाताच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या परिसरात दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

तर अचानक घडलेल्या या अपघाताने बसमधील सर्व प्रवासी खूप घाबरले तर. यामुळे बसमधील एका प्रवासाच्या अंगावर सर्व प्रवासी आल्याने त्यांच्या पायाला या घटनेत गंभीर जखम झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – ठाकरेंना उत्तर देण्यासाठी खेडच्या त्याच मैदानात आज सभा; काय बोलणार मुख्यमंत्री?