नाशिक-जव्हार रोडवर बसला अपघात; ४ ठार, ४५ जखमी

mokhada bus accident

नाशिक-जव्हार मार्गावरील तोरंगणा घाटात रविवारी, २४ मार्चला दुपारच्या सुमारास झालेल्या खासगी बसच्या अपघातात सूरत येथील ४ भाविक ठार, तर १५ प्रवाशी जखमी झाले. बसचालकाला अवघड वळणाचा अंदाज न आल्याने ही बस थेट १०० फूट खाली कोसळली. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर येथील दर्शनानंतर सर्व भाविक घराकडे परतत होते.

त्र्यंबकेश्वर ते जव्हार मार्गावर हा अपघात झाला. घटनेची माहिती अन्य वाहनांतील प्रवाशांसह स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या बसमध्ये एकूण ४५ प्रवाशी होते. अपघातातील किरकोळ जखमींवर त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात, तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.