घरमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

Subscribe

वाशिम : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (ता. फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. वाहान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच बस महामार्गावरच उलटली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील 15 प्रवासी जखमी असून, 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा… Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार; आता थेट गोंदिया टू मुंबई

- Advertisement -

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 5 ते 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

समृद्धी महामार्गावर 25 जानेवारीच्या पहाटे एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे बाजूच्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला होता. त्यानंतर 26 जानेवारीच्या रात्री पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली होती. या धडकेत एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा झाला होता. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका काही केल्या थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे यातील सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्गावर 71 रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचा निर्णय घण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांमध्ये 50 रुग्णवाहिका या आरोग्य विभागाच्या असतील तर 21 रुग्णवाहिका या MSRDC तैनात करणार आहे. याशिवाय मुंबई-पुणे महामार्गावर 21 रुग्णवाहिका ठेवण्यात येणार असून त्यात आरोग्य विभागाच्या पाच, तर 16 रुग्णवाहिका एमएसआरडीसी तैनात करणार आहे. पण समृद्धीवर सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप आणि तीव्र गतीने वाहन चालवणे यामुळे होत असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -