घरक्राइमराहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ; 'त्या' तरुणीकडून अंधेरी कोर्टात तक्रार दाखल

राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ तरुणीकडून अंधेरी कोर्टात तक्रार दाखल

Subscribe

मी बलात्कार पीडित आहे. राहुल शेवाळेंविरोधात माझा लढा सुरु आहे. आता मी राहुल शेवाळे यांच्याविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सीआरपीसी कलम १५६(३) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. मी रुपाली ढोंबरे-पाटील यांचे आभार मानते. त्यांनी मला ही तक्रार दाखल करण्यासाठी खूप मदत केली आहे.

मुंबईः शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बलात्कार पीडीतेने ही तक्रार दाखल केली आहे. पीडितेने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

मी बलात्कार पीडित आहे. राहुल शेवाळेंविरोधात माझा लढा सुरु आहे. आता मी राहुल शेवाळे यांच्याविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सीआरपीसी कलम १५६(३) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. मी रुपाली ढोंबरे-पाटील यांचे आभार मानते. त्यांनी मला ही तक्रार दाखल करण्यासाठी खूप मदत केली आहे. पण मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही. राहुल शेवाळे यांच्या सारखे राजकीय नेते आहेत तोपर्यंत असे घडतंच राहिल. आज मी आहे. उद्या कोणी तरी दुसरं असेल, असे पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितले.

- Advertisement -

याआधीही पीडित तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत राहुल शेवाळे यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता. त्याला पीडिते उत्तर दिले होते. खासदार राहुल शेवाळे हे किती वेळा पाकिस्तान व कराचीला गेले आहेत. तेथे त्यांचे काय व्यवसाय आहेत. तेथे त्यांचे कोणते कोणते हाॅटेल्स् आहेत. कोणते कोणते रिअल ईस्टेट आहेत. त्यांच्याकडे पैसे कुठून येतात, याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी पीडितेने केली होती.

- Advertisement -

मी दुबईची आहे. मी फॅशन डिझायनर आहे. मी अथक परिश्रम करुन करिअर केले आहे. मी दुबईची असल्याने अनेक देशात माझे मित्र आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश तेथील माझे मित्र आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप केले आहेत, असा दावा पीडित मुलीने केला.

राहुल शेवाळे मला भेटायला दुबईत येत होते. त्यानंतर ते कोणत्या कोणत्या देशात जात होते याचा तपास एनआयएने करावा. त्यांच्या विमान प्रवासाच्या तपशीलातून सर्व सत्य समोर येईल. ते पाकिस्तान, कराची व अन्य कुठे कुठे गेले होते याची माहिती एनआयएने घ्यावी. त्यांचे कुठे कुठे व्यवसाय आहेत. हाॅटेल व रिअल ईस्टेटचे व्यवसाय कुठे कुठे आहेत. त्यांना पैसे कुठुन मिळतात, हे एनआयएने तपासावे, अशी मागणी पीडित मुलीने केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -