घरताज्या घडामोडीखासगी डॉक्टरांना ही मिळणार कोविड विमा संरक्षण

खासगी डॉक्टरांना ही मिळणार कोविड विमा संरक्षण

Subscribe

शासकीय रुग्णालयात कोरोनावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. अशा परिस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशननेही राज्यात खासगी रुग्णालये आणि दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांना ही विमा संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. अखेर सरकारने आयएमएची मागणी मान्य केली आहे.

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, कोविड-१९ च्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना’ या अंतर्गत डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. मात्र, या योजनेत खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचा सहभाग नसल्यामुळे डॉक्टर प्रचंड संतापले होते.

- Advertisement -

आयएमएचे अध्यक्ष अविनाश भोंडवे म्हणाले की, असे बरेच डॉक्टर आहेत ज्यांना रुग्णांच्या क्लिनिकमध्ये आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत या योजनेत त्यांचा ही समावेश करणे आवश्यक आहे. आतापर्यंत राज्यातील ५० खासगी डॉक्टरांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळाली पाहिजे कारण ते इतर डॉक्टरांसारखेच जोखीम घेत आहेत. आम्ही राज्य सरकारकडे वरील मागणी केली होती. अखेरीस ही मागणी मान्य केली गेली आहे. या योजनेत अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि इतर डॉक्टरांचा समावेश आहे. आजारामुळे आपला जीव गमावलेल्या डॉक्टरांच्या कुटूंबाशी संपर्क साधून आम्ही त्यांना विम्याचा दावा करण्यास सांगत आहोत जेणेकरुन त्यांना आर्थिक मदत मिळेल.


हेही वाचा – Corona Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -