नाशिक – राज्यभरात निकालाचा धुराळा सुरू असताना दुसरीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीने फाटाफुट टाळण्यासाठी खासगी विमान तैनात केले आहे.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरस रंगली आहे. शनिवारी (दि.२३) सकळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना रंगला असताना, दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू व शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. याशिवाय राज ठाकरेंची मनसे व प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. ही चुरस आणि मतदारांचा मिळणारा कल पाहता महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली असून, फाटाफुट टाळण्यासाठी नाशिक विमानतळावर निरमा ग्रूपचे खासगी विमान तैनात केले आहे.