घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनामुळे खासगी रेल्वे सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद

Coronavirus : कोरोनामुळे खासगी रेल्वे सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद

Subscribe

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे चालविण्यात येणाऱ्या तीन खासगी एक्स्प्रेस गाड्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे चालविण्यात येणाऱ्या तीन खासगी एक्स्प्रेस गाड्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. या काळातील प्रवाशांना तिकिटांच्या रकमेचा परतावा मिळणार आहे. देशात कोरोनाचा आजार बळावल्यानंतर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे या काळात गाड्या धावणार नाहीत. यामध्ये मुंबई – अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, लखनऊ- दिल्ली तेजस एक्स्प्रेस आणि वाराणसी-इंदौर काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

१४ एप्रिलनंतर रेल्वे सुरू होईल, असे काही नागरिकांनी गृहीत धरले असून आयआरसीटीसीने खासगी तीन ट्रेनच्या आरक्षणावर ३० एप्रिलपर्यंत बंदी केली आहे. म्हणजेच लॉकडाऊन हा ३० एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयआरसीटीसीने फूड प्लाझा, रिफ्रेशमेन्ट रूम, जन आहार केंद्र आणि स्वयंपाक घर पूर्णपणे बंद केले आहे.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना बाधित रुग्ण ४ हजारांपेक्षा अधिक झाले आहेत. आणि ११५ हुन अधिक लोकांचा बळी गेला आहे.

अनेक ठिकाणी अडकले नागरिक

पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यावर देशातील सर्व मार्ग बंद झाले. यावेळी कामानिमित्त बाहेर गेलेले, तसेच सण-उत्सवासाठी गावी गेलेले नागरिक अडकले आहे. त्यामुळे रेल्वेसेवा कधी सुरू होतेय, आणि आपण इच्छितस्थळी कधी पोहचतो असे, काही नागरिकांना वाटत आहे. परंतु दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू केली, तर परिस्थिती आणखी चिघळू शकते, असेही मत व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

 

या काळातील तिन्ही गाड्यांचे प्रवाशांचे आरक्षण असेल तर ते रद्द केले जाईल. संबंधित प्रवाशांना संपूर्ण परतावा दिला जाईल.
– सिद्धार्थ सिंग, संयुक्त महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -