घरCORONA UPDATEकोरोनाच्या काळात खासगी प्रवास सुरक्षित; आयआयटी मुंबई आणि हैदराबाद संशोधकांचा सर्व्हे

कोरोनाच्या काळात खासगी प्रवास सुरक्षित; आयआयटी मुंबई आणि हैदराबाद संशोधकांचा सर्व्हे

Subscribe

कोरोनाच्या काळात खासगी वाहतूक सेवा हीच सुरक्षित सेवा असल्याचे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या काळात खासगी वाहतूक सेवा हीच सुरक्षित सेवा असल्याचे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. कोरोनाची लागण होण्याचा सुरुवातीचा काळात दररोज कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची प्रवासाबाबतची मते आयआयटी मुंबई आणि आयआयटी हैदराबादमधील संशोधकांनी जाणून घेण्यासाठी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष निघाला आहे.

सरकारने जारी केलेला लॉकडाऊनमुळे बस, मेट्रो, ट्रेन या सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी कमी होऊन कोरोनाचे विषाणूचा प्रसार होण्यास अटकाव होईल आणि धोका कमी करण्यास मदत होईल यावर विश्वास ठेवून संशोधकांनी सर्वेक्षणाला सुरुवात केली. कोरोनाच्या काळात प्रवासासंदर्भातील मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेमधून करण्यात आला. डॉ. दिग्विजय पवार, आयआयटी हैदराबादमधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रिथा चॅटर्जी आणि आयआयटी मुंबईमधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक नागेंद्र वेळगा, आयआयटी मुंबईमध्ये संशोधन करणारा विद्यार्थी अंकित कुमार यादव यांनी एकत्रित येऊन हे सर्वेक्षण केले.

- Advertisement -

भारतात कोरोनाचा तिसरा आठवडा सुरू असताना आणि लॉकडाऊन करण्यापूर्वी नागरिकांचा प्रवास व त्यासंदर्भातील बदलणारी मते याचा अभ्यास करणाऱ्या या सर्व्हेमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या १९०० पेक्षा अधिक व्यक्तींची ऑनलाईन माहिती घेण्यात आली. या सर्व्हेला प्रथम दर्जाच्या शहरातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. प्रथम दर्जाच्या शहरातून ६३.६, दुसऱ्या दर्जाच्या शहरातून २०.६ आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरातून १५.८ टक्के लोकांनी सर्व्हेला प्रतिसाद दिला. सर्वेक्षणामध्ये कोरोनादरम्यान खासगी आणि सरकारी वाहतुकीपैकी कोणती सेवा सुरक्षित आहे या विचारलेल्या प्रश्नावर ९३ टक्के लोकांनी खासगी सेवा सुरक्षित असल्याचे सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रथम दर्जाच्या शहारातील १२ टक्के लोकांनी सार्वजनिक वाहतूक सेवा नाकारत खासगी सेवेला प्राधान्य दिले. हेच प्रमाण दुसऱ्या दर्जातील शहरांमध्ये ९ तर तिसऱ्या टप्प्यातील शहरांमध्ये ७ टक्के इतके होते. त्याचप्रमाणे सरकारी वाहतूक सेवेमध्ये सोशल डिस्टसिंग कसे राखायचा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. सरकारी वाहतूक सेवेतून प्रवास करताना सोशल डिस्टसिंग राखण्याबाबत प्रवाशांच्या मानत अनिश्चितता दिसून आली. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या प्रवास करण्याच्या पद्धतीत बदल होत असल्याचे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे दिग्विजय पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून आम्ही कामावर जाणे बंद केल्याचे ४८ टक्के लोकांनी सांगितले, तर २८ टक्के लोकांनी आम्ही प्रवास करून कामावर जात असल्याचे सांगितले. तसेच सर्व्हेमधील १८ टक्के लोकांनी कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर आपला विमान प्रवास रद्द केला, तर २० टक्के लोकांनी त्यांचा ट्रेन प्रवास रद्द केला. यावरून असे दिसून येते की प्रथम दर्जाच्या शहरांमध्ये कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता आहे. त्याखालोखाल दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -