घरताज्या घडामोडीअभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला रामराम; फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला रामराम; फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

Subscribe

दिवंगत अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ ला पक्षीय कार्यकारणी बैठक झाली.

दिवंगत अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ ला पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मधला प्रवेश स्वीकारला. (Priya Baird Joined Bjp Party In The Presence Of DCM Devendra Fadnavis)

प्रिया बेर्डेयांनी ७ जुलै २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्ष प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी प्रिया बेर्डे यांना १० लाख रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पुण्यात २०१२ साली अखिल भारतीय चित्रपट मंडळाकडून ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चावर कोल्हापूर येथील काही सभासदांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर पुढे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे प्रिया बेर्डे सह अलका कुबल, विजय पाटकर याना १० लाख रुपये एका आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

- Advertisement -

प्रिया आणि लक्ष्मीकांत यांची मुलं स्वानंदी आणि अभिनय हे दोघे सुद्दा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे सध्या लेक स्वानंदी सोबत धनंजय माने इथेच राहतात या नाटकात अभिनय करत आहेत.


हेही वाचा – न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करताना न्यायाची दयेसोबत गल्लत करू नये – सरन्यायाधीश चंद्रचूड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -