गद्दारी करणं शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

priyanka chaturvedi

राज्यातील सत्तांतरांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर निशाणा साधत गद्दार आणि विश्वासघात केल्याचं म्हणत पाठित खंजीर खूपसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, पुढील दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. २२ तारखेला कोर्टाचा निकाल येईल. त्यावेळी त्यांच्यासाठी येणाऱ्या या सर्व रात्री काळोख रात्री ठरणार आहेत. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये काय मनमानी करायची आहे, ती करून घ्या, तुम्ही पाठित खंजीर खुपसला आहे. गद्दारी करणे ही दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

शिंदे गटानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चित्रा वाघ या सर्वज्ञानी आहेत, मात्र सध्या पक्षात त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. संजय राठोडांविरोधात त्यांनी एवढा संघर्ष केला. मात्र, त्यांचे पक्षात कोणेही न ऐकल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीतील वाद विधानपरिषदेच्या निवडीवरून समोर येत आहे. विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि शिवसेना उभी ठाकली आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेनेवर नाराज असल्याचे दिसून आले आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या आमदारांना कामकाज सल्लागार समितीवर घेण्याचं टाळलं – जयंत पाटील