घरमहाराष्ट्रशिवसेनेभोवती ईडीचा पाश घट्ट

शिवसेनेभोवती ईडीचा पाश घट्ट

Subscribe

बजरंग खरमाटेंच्या घरावर ईडीचा छापा, अनिल परबांच्या अडचणीत वाढ

राज्याचे परिवहन मंत्री तसेच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला. या छाप्यादरम्यान ईडीने काही महत्वाची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते. खरमाटे यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या छापेमारीमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या छापेमारीचे अनिल परब यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे.

अनिल परब यांना 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाखाली ईडीने रविवारी समन्स बजावले आहे. परब यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या पाठोपाठ ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सोमवारी छापेमारी केली. या दरम्यान ईडीने खरमाटे यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतले असून त्यात काही पुरावे मिळतात का, हे ईडीकडून तपासले जात आहे.

- Advertisement -

बजरंग खरमाटे यांच्यासह पाच जणांविरुद्ध मे महिन्यात परिवहन विभागातील निलंबित वरिष्ठ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत पाटील यांनी विभागातील बदल्या आणि पोस्टिंग करण्यासाठी कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप केला होता. 250 ते 300 कोटी रुपयांचा हा आर्थिक व्यवहार झाला असून यातील मास्टरमाइंड बजरंग खरमाटे असल्याचे पाटील यांनी अर्जात म्हटले होते.

ठाकरे सरकार घोटाळा इलेव्हन

प्रताप सरनाईक
अनिल देशमुख
अनिल परब
भावना गवळी
महापौर किशोरी पेडणेकर
रविंद्र वायकर
जितेंद्र आव्हाड
छगन भुजबळ
यशवंत जाधव
यामिनी जाधव
मिलिंद नार्वेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -