घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोरोनामुक्तीनंतर डोळा गमावण्यासह दात, चेहरा, डोकेदुखीची समस्या

कोरोनामुक्तीनंतर डोळा गमावण्यासह दात, चेहरा, डोकेदुखीची समस्या

Subscribe

नाशिक, धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांतून पोस्ट कोविड म्युकॉरमायकोसिस, कोविडनंतर आढळणारा बुरशीजन्य आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हा आजार कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. हा आजार अनियंत्रित मधुमेह, अतिदक्षता विभागात बरेस दिवस वास्तव्य असलेल्या अवयव प्रत्यारोपण झालेल्या स्टेरॉईड्स, औषधे दिलेल्या रुग्णांमध्ये व कोविडमुळे उद्भवत आहे.
या आजाराचे लवकर निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होतो, अन्यथा जंतू संसर्गामुळे डोळा गमावण्याची वेळ अनेक रुग्णांवर आली आहे. त्यामुळे लक्षणांची सुरुवात झाल्यास तात्काळ दंतवैद्यक, नाक, कान घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणे गरजेचे झाले आहे.

बुरशी जंतूमुळे आजाराची सुरुवात नाकापासून होते. त्यानंतर टाळू, डोळे तसेच मेंदूपर्यत तो पसरतो. म्युकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसर्‍याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही. गेल्या महिनाभरात धुळ्यातील एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये कान, नाक घसा विभाग व दंतरोग विभागात या आजाराचे 55 रुग्ण दाखल झाले. त्यातील 49 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. या आजारांवरील उपचारासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा विभागप्रुख डॉ. आर. व्ही. पाटील, डेंटल कॉलेज ओरल मॅक्सिफेशियल सर्जरी विभाप्रमुख डॉ. बी. एम. रूडगी, प्रा. शरण बसप्पा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

म्युकॉरमायकोसिसचा धोका कोणाला?

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना धोका आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना अधिक धोका असतो.

आजाराचे टप्पे

टप्पा १ : नाकापर्यंत मर्यादित नाक व सायनेस
टप्पा २ : डोळयापर्यंत पसरणे
टप्पा ३ : मेंदूपर्यंत पसरणे, बेशुध्द होणे,
अर्धांग वायू होणे.

- Advertisement -

म्युकॅारमायकोसिसची लक्षणे कोणती?

नाकातला श्वास कोंडणे, काळया बुरशीचा चटटा नाक, टाळू हार्ड पॅलेट येथे आढळणे, गाल व दात दुखणे, दात व गाल दुखणे व सुजणे, चेहर्‍याच्या हाडांना असहय वेदना होणे, डोळा दुखणे व सुजणे तसेच दृष्टी कमजोर होणे. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आणि मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांनी मुख आरोग्य तपासणी करून घ्यावी.दंत चिकित्सकांनी दातासंबंधी तक्रार घेऊन येणार्‍या रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना योग्य सल्ला द्यावा.
– डॉ.बी.एम.रूडगी, विभाग प्रमुख, ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी, एसीपीएम दंतवैद्यकीय महाविद्यालय, धुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -