घरमहाराष्ट्र३४ जिल्ह्यांसाठी डायलिसिस मशीनची खरेदी

३४ जिल्ह्यांसाठी डायलिसिस मशीनची खरेदी

Subscribe

खासगी रुग्णालयात किडनी आणि डायलिसीसचे उपचार सर्वसामान्याना परवडत नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून राज्याच्या ३४ जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटरसाठी डायलिसिस मशिन्स खरेदी करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

जीवनशैलीशी निगडित आजार वाढत असल्याने अनेकांना सध्या डायलिसीसची गरज भासू लागली आहे. ग्रामीण भागात अजूनही डायलिसीसची केंद्रांची संख्या पुरेशी नसल्याने सुमारे ३५ डायलिसीस युनिटसाठी आणि सध्या कार्यरत असलेल्या तीन युनिटसाठी १०९ डायलिसीस मशीन्स, डायलिसीस मशिन्ससाठी २५ आरओ प्लान्टची उभारणी करण्यात येणार आहे. डायलिसीस युनिटमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लान्ट बसवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

डायलिसीस सेंटरसाठी ९ कोटी ९१ लाख ५० हजार रुपये खर्च करून ही डायलिसीस सेंटर सुरु करण्यात येणार असून या खरेदीस सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या डायलिसीस युनिटसाठी निविदा प्रक्रीया हाफकीन बायोफार्मास्युटिकलमार्फत राबवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

या जिल्ह्यात होणार नवीन डायलिसीस युनिट

नाशिक, गोंदिया अकोला, नांदेड, वाशिम, वर्धा, बुलडाणा, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, पुणे, यवतमाळ, वर्धा, पालघर, रत्नागिरी, हिंगोली, लातूर, रायगड, ठाणे, सांगली, कोल्हापूर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -