घरताज्या घडामोडीआता बचतगटांची उत्पादने 'Amazon'वर

आता बचतगटांची उत्पादने ‘Amazon’वर

Subscribe

कोरोना संकटकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या बचतगटांना ॲमेझॉन, जीईएमसारखे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली. यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू घरपोच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला बचतगटाची उत्पादने, वस्तू ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज झाला. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनमार्फत सध्या देशभर उपलब्ध असून लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविध स्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. परंतु स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन आणि जीईएमसारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आल्याचे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.

- Advertisement -

ॲमेझॉनवर उपलब्ध उत्पादन

विविध प्रकारचे पापड, पेपर बॅग टेराकोटा ज्वेलरी, सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले, रेशमी ज्वेलरी, शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -