Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शहरी नक्षलवादाप्रकरणी तुरुंगात असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

शहरी नक्षलवादाप्रकरणी तुरुंगात असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

Subscribe

याप्रकरणात वरवरा राव यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक अंतरिम आदेश काढून भीमा कोरेगाव प्रकरणातील आणखी एक आरोपी गौतम नवलखा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना महिन्याभरासाठी घरात नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई – शहरी नक्षलवादप्रकरणी तळोजा कारागृहात असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या जामीनाला आठवड्याभराची स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. कारण, एनआयए या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. न्यायालयाने एनआयएची मागणी मान्य केली असून तेलतुंबडे यांच्या जामीन देण्याच्या निर्णयाला एक आठवड्याची स्थगिती दिली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

- Advertisement -

तेलतुंबडे यांना एप्रिल २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात आहेत. विशेष कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेलतुंबडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यातील एल्गार परिषदेत ते उपस्थित नव्हते आणि त्यावेळी त्यांनी कोणतंही चिथावणीखोर भाषण केलं नव्हतं, असा दावा तेलतुंबडे यांनी याचिकेत केला होता.

हेही वाचा राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात सापडले निनावी पत्र

- Advertisement -

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरगाव लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाली होती. यावेळी हिंसाचार घडला होता. यामध्ये एकाचा मृत्यू तर, १० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हिंसाचारप्रकरणी राज्यव्यापी बंददरम्यान पोलिसांनी १६२ लोकांविरोधात ५८ गुन्हे दाखल केले होते.

याप्रकरणात वरवरा राव यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक अंतरिम आदेश काढून भीमा कोरेगाव प्रकरणातील आणखी एक आरोपी गौतम नवलखा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना महिन्याभरासाठी घरात नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -