प्रा. विजय देव यांचे पुण्यात निधन

प्रा. विजय देव

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, अभ्यासक यांचे काल रात्री (दिनांक 10) पुणे येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, मुलगी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व मधुरा असा परिवार आहे. ख्यातनाम लेखक इतिहाससंशोधक गो. नि. दांडेकर यांचे ते जावई होत.

त्यांचे पार्थिव आज सकाळी दहा पासून पुणे येथीप्रा. विजय देव ल निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने पुण्यातील साहित्य आणि शिक्षण विश्वावर शोककळा पसरली आहे.