घरआतल्या बातम्याडॉ. प्रदीप व्यास यांची अतिरिक्त मुख्य सचिव पदावर बढती

डॉ. प्रदीप व्यास यांची अतिरिक्त मुख्य सचिव पदावर बढती

Subscribe

डॉ.प्रदीप व्यास यांची राज्यात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना शुक्रवारी अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची आहे. त्या विभागात पदस्थापना करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. व्यास हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ तुकडीचे अधिकारी आहेत. जयपूर येथे त्यांनी एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पेडीयाट्रीकचे शिक्षण पूर्ण केले. राज्यात कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचे वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव त्यासाठी कामी येत आहे.

सेवेच्या सुरूवातीचे आठ वर्ष त्यांनी तामिळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात सेवा बजावली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात आठ वर्ष सेवा केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी, राज्याचे वित्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जुलै २०१७ पासून डॉ. व्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाच्या लाटेत ढकलणार्‍या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदी असलेल्या डॉ. प्रदीप व्यास यांची लवकरच उचलबांगडी करण्यात येणार असल्याची माहीती एका उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली होती. राज्यात आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत अपयशी ठरल्यामुळे अनेक कॅबिनेट मंत्र्यांची नाराजी डॉ. प्रदीप व्यास यांनी ओढावून घेतली आहे. त्यामुळे डॉ. प्रदीप व्यास यांची बदली होणार हे निश्चित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -