Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

मार्चच्या पहिल्या आठवड्यात पालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

महापालिकेच्या कर्मचार्‍यांची तेरा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रशासनाने दिलेला १५ फेब्रुवारीचा मुहूर्त टळला आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीची ‘गुड न्यूज’ महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

महापालिकेच्या कर्मचार्‍यांची तेरा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रशासनाने दिलेला १५ फेब्रुवारीचा मुहूर्त टळला आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीची ‘गुड न्यूज’ महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

आयुक्तपदावरील अधिकार्‍यांची सातत्याने होणारी बदली, मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महिने सुरु असलेला गोंधळ, नवीन पद भरतीस परवानगी नसल्याने जुन्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर असलेली अतिरिक्त जबाबदारी या सर्वांचा परिणाम महापालिकेतील पदोन्नतीवर झाला आहे. गेल्या तेरा वर्षांपासून महापालिकेतील बहुसंख्य अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नत्याच देण्यात न आल्याने संबंधितांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. ही बाब लक्षात घेत गेल्या ५ जानेवारीपासून पदोन्नतीसाठी प्रशासनाने विभाग निहाय बैठका सुरु केल्या. महापालिकेत ४ हजार ७१२ अधिकारी व कर्मचारीच कार्यरत आहेत. आकृतिबंधानुसार ७०८२ पदे मंजूर आहेत. यातील ३६८ पदे खुले आहेत. सुमारे २ हजार ३७० पदे रिक्त आहेत. प्रशासनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात ३५० रिक्त पदांवर पदोन्नतीची संधी देण्यात येणार आहे. प्रारंभीच्या काळात २०२०च्या वर्षअखेरपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले. हा मुहूर्त टळल्यावर स्थायी समितीच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली. या वेळी सभापती गणेश गिते यांनी १० फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीसाठी अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसंदर्भात छाननी प्रक्रिया अद्याप सुरु असल्याचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी सांगितले. यात कास्ट व्हेरिफिकेशन, शैक्षणिक पात्रतेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता या बाबींचा समावेश आहे. त्यानंतर पदोन्नतीचा अहवाल आयुक्त कैलास जाधव यांच्यासमोर सादर होईल. या प्रक्रियेला मार्च उजडणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल असे घोडे-पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -