घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिका: पदोन्नतीचा बिगुल वाजला; बैठका सुरु

महापालिका: पदोन्नतीचा बिगुल वाजला; बैठका सुरु

Subscribe

गेल्या सात वर्षांपासून महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा अडसर आता दूर झाला असून मंगळवार (दि. ५) पासून पदोन्नतीसाठी प्रशासनाने विभाग निहाय बैठका सुरु केल्या आहेत. यानुसार मंगळवारी प्रशासकीय संवर्गातील बैठकीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २३०० रिक्त पदांवर पदोन्नतीची संधी देण्यात येणार आहे.

गेल्या सात वर्षांपासून महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा अडसर आता दूर झाला असून मंगळवार (दि. ५) पासून पदोन्नतीसाठी प्रशासनाने विभाग निहाय बैठका सुरु केल्या आहेत. यानुसार मंगळवारी प्रशासकीय संवर्गातील बैठकीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २३०० रिक्त पदांवर पदोन्नतीची संधी देण्यात येणार आहे.
महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला असला तरी, अद्याप ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसारच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ‘ब’ वर्गानुसार १४००० अधिकारी व कर्मचारी अपेक्षित असल्याचा अहवाल आयुक्तपदी अभिषेक कृष्णा असताना शासनाकडे पाठवला गेला. तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी आल्यानंतर त्यातील अनेक पदांना कात्री लावली गेली. आकृतिबंधातील पदांची संख्या कमी केल्यानंतर नगरविकास खात्याकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. एकीकडे, अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या झपाट्याने कमी होत असताना रिक्त पदे भरण्यात अडचण आहे. सध्या प्रभारी कार्यभार देत या रिक्त पदांवर कनिष्ठ अधिकार्‍यांकडून काम करून घेतले जात आहे. मात्र, त्यांना वेतनश्रेणी कनिष्ठ मिळत आहे. ही बाब लक्षात घेत, रिक्त पदांवर प्रभारी कार्यभार देण्यापेक्षा पदोन्नती देण्याची मागणी होत होती. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनीदेखील पाठपुरावा केला होता. स्थायी समिती सभेत त्याचे गंभीर पडसाद उमटले. त्यानंतर आता प्रशासनाने मंगळवारपासून विभागनिहाय पदोन्नतीसाठी बैठका घेणे सुरु केले आहे.या बैठकीत संबंधित विभागाचा प्रमुख आपल्याकडील पदोन्नतीस पात्र अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी देईल, त्यानंतर रिक्त पदांवर किंवा त्याच विभागात जागा शिल्लक असेल तर त्यास पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी समिती गठित करण्यात आली असून सदस्य सचिव म्हणून प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील तर सदस्यपदी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे, उपायुक्त प्रदीप चौधरी आदी असतील.

Nmc
महापालिकेच्या कर्मचार्‍यांना नवोवर्षात पदोन्नतीचे गीफ्ट मिळणार असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने २८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तावर आजच्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब झाले आहे.
  • ४७१२ अधिकारी व कर्मचारीच कार्यरत
  • महापालिकेचा आकृतिबंधानुसार ७०८२ पदे मंजूर
  • यातील ३६८ पदे खुले आहेत. सुमारे २३७० पदे रिक्त आहेत

अशा होणार बैठका-

  • अभियांत्रिकी संवर्ग : १२ जानेवारी
  • अग्निशामक व सार्वजनिक आरोग्य विभाग : १४ जानेवारी
  • घनकचरा व उद्यान : १९ जानेवारी
  •  इतर विभाग : २१ जानेवारी
  •  प्रशासकीय संवर्ग : ५ जानेवारी
  • लेखा व लेखापरीक्षण संवर्ग : ७ जानेवारी

 

महापालिका: पदोन्नतीचा बिगुल वाजला; बैठका सुरु
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -