घरताज्या घडामोडीCorona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

Corona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

Subscribe

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या सुरुवातीपासून रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे जेष्ठ नागरिकांनाच या विषाणूची लागण होते, असा समज आता खोटा ठरला आहे. सर्वच वयोगटातील लोकांना या विषाणूची लागण होत आहे. या संदर्भात कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून लक्षात येत आहे. हा जीवघेण्या कोरोनाचा सर्वाधिक फटका तरुण वर्गाला बसला आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार तरुण म्हणजेच ३१ ते ४० या वयोगटातील तरुण सर्वाधिक कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य शासनाकडून ५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वाजता जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १४ लाख ४३ हजार होती ४०९ होता. यापैकी १४ लाख ३१ हजार ८७८ रुग्णांची वयोगटानुसार आकडेवारी अहवालात देण्यात आली. यानुसार ० ते १० वर्षे ते ९१ ते १०० वर्षे या वयोगटापर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण कमी-अधिक प्रमाणात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचे प्रमाण ३१ ते ४० वर्षे (३ लाख ५ हजार ५२ रुग्ण) या वयोगटात आहे. तर सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची प्रमाण ९१ ते १०० (२ हजार ५४४ रुग्ण) या वयोगटातील आहे. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर तरुणांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती असणे फार महत्त्वाचे असते. या सर्व वयोगटात लहान मुलांची अधिक रोगप्रतिकारशक्ती असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यती कमी असल्याचे सांगितले जात होते. वास्तविक या वयोगटातील कोरोनाचे प्रमाण ३.७० टक्के (५२ हजार ९७०रुग्ण) आहे. तर ११ ते २० वर्षे या वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण ६.८८ टक्के (९८ हजार ५८७ रुग्ण) आहे. तर तरुण म्हणजेच २० ते ३० वर्षे या वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण १६.९७ टक्के (२ लाख ४३ हजार ३३ रुग्ण) इतके आहे. तर ३१ ते ४० टक्के वयोगटातील प्रमाण सर्वाधिक २१.३३ टक्के आहे.

तसेच ४१ ते ५० वर्षे या वयोगटातील कोरोनाचे प्रमाण १७.९० टक्के (२ लाख ५६ हजार ३७५ रुग्ण) आहे. ६१ ते ७० वर्षे वयोगटातील विषाणूचे प्रमाण १०.६५ टक्के (१ लाख ५२ हजार ४६५ रुग्ण) आहे. तर ७१ ते ८० वर्षे या वयोगटात ५.०३ टक्के (७१,९९२) तर ८१ ते ९० वर्षे या वयोगटात १.४८ टक्के (२० हजार १६४रुग्ण) आहे. ९० ते १०० वर्षे या वयोगटात बाधितांचे प्रमाण ०.१८ टक्के आहे. त्यामुळे सध्या तरुण वयोगटातील लोकांनी काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -