Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार : भुजबळ

पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार : भुजबळ

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, मार्च अखेरीस महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन आणि येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. येणार्‍या काळात नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय पर्यटनाच्या संधी निर्माण व्हाव्यात व नाशिक एक वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी आपला मानस असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठीच्या सर्व बाबींच्या सुक्ष्म आराखड्यासह प्रस्ताव तात्काळ केंद्र शासनास सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मंत्रालय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही भुजबळ यांनी सांगितले.

प्रस्तावित जागेची पाहणी
या महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली, आहे त्यानुसार पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विद्यापीठाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह विद्यापीठाच्या आवाराला लागून असलेल्या प्रस्तावित जागेस भेट दिली. यावेळी स्वतंत्र आर्किटेक्टद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महाविद्यालयाच्या भुखंडाचा विचार करून आराखडा तयार करावा असे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या महाविद्यालयाकरीता १४ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisement -