औरंगाबाद : माजी उपसभापती यांच्या लॉजवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी उपसभापती यांच्या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना औरंगाबाद येथील वैजापूरमध्ये महाराणा चौकात उपसभापतींचा लक्ष्मी हा लॉज आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत माजी उपसभापतीसह मॅनेजरला देखील अटक करण्यात आली आहे.
विष्णु भिमराव जेजुरकर हे माजी उपसभापती आहेत. लॉजचा मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार औरंगाबादच्या वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉज वेश्या व्यवसाय सुरू होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यासाठी खोट्या ग्राहकांस लक्षमी लॉजवर पाठवण्यात आले. या ग्राहकाला लॉज मॅनेजर मंच्छिंद्र विनायक जगदाळे यांनी त्याला तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल, असे सांगितले. यानंतर पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 201 मध्ये जा. खोलीत एक महिलेला पाठविण्यास सांगितले. या लॉजमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची पोलिसांची खात्री झाली. या खोट्या ग्राहकाने रुममध्ये गेल्यावर पोलिसांना इशारा दिला. तेव्हा पोलिसांनी लॉजवर धाड टाकून कारवाई केली.
हेही वाचा – चक्क! न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांचा एल्गार; .. अन्यथा टाकणार कामकाजावर बहिष्कार
पोलिसांकडून उपसभापतींवर गुन्हा दाखल
यावेळी पोलिसांनी पिडीत महिलेची सुटका केल्यानंतर माजी उपसभापती आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी उपसभापती आणि मॅनेजरवर कलम 3, 4, 5 अवैधरित्या वेश्या व्यवसाय अधिनियम 1956 गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी 12 हजार 290 रोख रक्कम, निरोध पाकिट आणि मोबाईल फोन असा एकूण 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.