घरमहाराष्ट्रबेस्टमधील कंत्राटी कामगारांचे वडाळा बस डेपोत आंदोलन

बेस्टमधील कंत्राटी कामगारांचे वडाळा बस डेपोत आंदोलन

Subscribe

वास्तविक, कंत्राटी कामगार हे बेस्ट उपक्रमात बेस्टच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच व तेवढेच काम करतात. मात्र त्यांना बेस्टच्या कायम कामगारांप्रमाणे समान वेतन दिले जात नाही. तसेच, या कामगारांना आवश्यक त्या सेवासुविधाही दिल्या जात नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे, असे कामगार नेते शशांक राव यांनी म्हटले आहे.

मुंबई – बेस्ट परिवहन विभागातील कंत्राटी बस चालकांनी समान वेतन व आवश्यक सेवासुविधा आदी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी वडाळा बस डेपोमध्ये आंदोलन केले. तत्पूर्वी सोमवारी ओशिवरा बस डेपोतही कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले होते.

हेही वाचा – अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सोनिया गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन

- Advertisement -

सदर कामगारांनी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उत्स्फूर्त आंदोलन केले. या कामगारांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत कामगार नेते शशांक राव यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक व मुंबई महापालिका आयुक्त आणि संबंधित कंत्राटदार कंपन्यांना यांना एक लिखित निवेदन दिले व कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्याची मागणी केली.
दरम्यान बुधवारी शिवाजी नगर बस डेपोमध्येही कंत्राटी कामगार आंदोलन करणार आहेत, अशी माहिती कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘पाट्याटाकू’ ५२२ दुकानदारांना पालिकेच्या नोटिसा; २ हजार १५८ ठिकाणी झाडाझडती

- Advertisement -

वास्तविक, कंत्राटी कामगार हे बेस्ट उपक्रमात बेस्टच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच व तेवढेच काम करतात. मात्र त्यांना बेस्टच्या कायम कामगारांप्रमाणे समान वेतन दिले जात नाही. तसेच, या कामगारांना आवश्यक त्या सेवासुविधाही दिल्या जात नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे, असे कामगार नेते शशांक राव यांनी म्हटले आहे.

बेस्टच्या कायम कामगारांप्रमाणेच सदर कंत्राटी कामगारांनाही “समान काम समान वेतन” लागू करावे. आगामी काळात मुंबईकरांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा कमी केली किंवा दुस-या संस्थांना कंत्राट दिले तरी सध्याच्या कामगारांना काढून न टाकता नियमित करण्यात यावे. तसेच बेस्टच्या कर्मचा-यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा, आदी मागण्या या युनियनतर्फे कामगार नेत्यांनी यावेळी केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -