घरताज्या घडामोडीनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबई, नागपूरमध्ये मोर्चे

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबई, नागपूरमध्ये मोर्चे

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील धार आता वाढत चालली आहे. मागचे काही दिवस ईशान्य भारत आणि नवी दिल्लीत कायद्याच्या विरोधात हिसंक आंदोलने झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही आंदोलन सुरु झाले आहे. आज मुंबईत बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईसह नागपूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथेही कायद्याचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावचा निषेध बस करा आणि आता ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र या, असे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक समविचारी संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. आज ऑगस्ट क्रांती मैदानात कन्हैया कुमारचे आझादी हे अँथम गात शेकडो तरुण, अल्पसंख्यांक समाजाचे बांधव, आंबेडकरी कार्यकर्ते ऑगस्ट क्रांती मैदानात दाखल झाले. अभिनेत्री हुमा कुरेशी, साकिब हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानात हजारोंच्या संख्येने आंदोलक आल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. देशात इतर ठिकाणाप्रमाणे मुंबईतील आंदोलन चिघळू नये, यासाठी या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -
nrc caa protest in mumbai
महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूनेही आंदोलन

एका बाजुला ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन होत असताना मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळ या कायद्याच्या बाजूनेही आंदोलन होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -