आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

मागील अनेक दिवसांपासून पुण्यात एमपीएसीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी सातत्याने एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाची हाक देत आहेत. अशातच आज सकाळी युवक काँग्रेसतर्फे पुण्यात पुन्हा एमपीएसी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

मागील अनेक दिवसांपासून पुण्यात एमपीएसीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी सातत्याने एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाची हाक देत आहेत. अशातच आज सकाळी युवक काँग्रेसतर्फे पुण्यात पुन्हा एमपीएसी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. (Protest Of Mpsc Students In Pune By Youth Congress)

सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती होते. एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत आयोगाने अंबलबजावणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे.

काही दिवसांपूर्वी शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील टिळक चौकात नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू होईल असं जाहीर केलं होतं. मात्र, याची अंबलबजावणी आणि ठोस भूमिका आयोगाने घेतली नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

याआधीही काँग्रेसनी केली होती मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मात्र एमपीएससीने याचे प्रसिद्धीपत्रक काढलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील, असे जाहीर केले असल्याने सर्व उमेदवार संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर करणारे प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने काढावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाला द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल यांनी केली आहे.


हेही वाचा – तातडीच्या सुनावणीसाठी उद्या या, सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला सल्ला