घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांना बैलगाडीतून कॉलेजमध्ये सोडत इंधन दरवाढीचा निषेध

विद्यार्थ्यांना बैलगाडीतून कॉलेजमध्ये सोडत इंधन दरवाढीचा निषेध

Subscribe

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीतून महाविद्यालयात सोडत अनोख्या पध्दतीने इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधन दराने तर शंभरी पार केली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर ११२.४६ रूपये तर डिझेला दर १०१.६५ रूपये प्रती लिटरपर्यंत पोहचला. यामुळे महागाई अधिकच वाढली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. पेट्रोल, डीझेलची सातत्त्याने होत असलेली दरवाढ रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी महाविद्यालय सुरु होण्याच्या मुहूर्तावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ही दरवाढ तातडीने रोखून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. यावेळी डॉ अमोल वाजे, जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, विभाग अध्यक्ष निलेश भंदुरे, विशाल डोके, रामदास मेदगे, समाधान तिवडे, राहुल कमानकर, जाणू नवले, नवराज रामराजे, निलेश सानप, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, विशाल पगार, महेश शेळके, रेहान शेख, अक्षय पाटील, सिद्धांत काळे, दादा निगळ, शिवाजी मटाले राजाराम पाटील निगळ, शुभम गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या पंधरा दिवसात सातत्याने पेट्रोल डीझेलची दरवाढ कायम असून नाशिकमध्ये आज पेट्रोलचा ११२.४६ तर डीझेल १०१.६५ रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढीचा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या कुटुंबाचे बजेट यामुळे संपूर्णपणे कोलमडून गेलेले आहे. याबाबत सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करत आहोत. पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. तरी देखील पेट्रोल डीझेलची दरवाढ थांबत नसून सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
अंबादास खैरे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -